#BolBhidu #WalmikKarad #SantoshDeshmukh
मस्साजोग, बीड जिल्ह्याच्या केजमधलं गाव. मागच्या चार दिवसांपासून हे गाव बातम्यांचा विषय बनलंय आणि त्याचं कारण ठरलं आहे, गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन झालेली हत्या. हत्येची घटना घडल्यानंतर मस्साजोगमधल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं, ज्याला मनोज जरांगे पाटील यांच्यापासून राजकीय नेत्यांनीही भेट दिली. लोकांचा रोष वाढला होताच, पण राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही धार चढली. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तिय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं.
त्यामुळं राजकीय वाद शिगेला जाण्याची चर्चा होऊ लागली, अशातच एक बातमी आली, संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले सोबतच वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्यावरही दाखल झालेला खंडणीचा गुन्हा. देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत काय खुलासे झाले आहेत ? खंडणीचा गुन्हा आणि हत्येचं प्रकरण यांचं कनेक्शन काय आहे ? कराड यांचं नाव चर्चेत का आलं आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
source